आपल्या भोवतालाची उंची वाढवली नाही, तर आपली उंची कोसळू शकते. म्हणूनच निदान आपल्या स्वार्थासाठी का होईना, आपला भोवताल आपण घडवायला हवा
मित्रहो, आपले पगार आपल्या आवश्यक गरजा भागवण्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्येच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना इतर धंदा, व्यवसाय, प्लॉटिंग, ट्यूशन करण्याची गरज नाही. हवं तर विद्यार्थ्यांना मोफत शिकवायला हरकत नाही. आपण ज्या गावात राहतो, ते गाव आणि गावातलं वातावरण सुसंस्कृत असेल, तर त्यात आपण अधिकची भर घालायला हवी. आपल्यासारखे वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, रसिकजन आपल्याभोवती निर्माण करणं, ही आपली जबाबदारी असते.......